Talathi Bharti 2025 Image jpg

Talathi Bharti 2025 : तलाठी भरती निवड प्रक्रिया, पात्रता, अभ्यासक्रम सर्व माहिती इथे पहा!

Talathi Bharti 2025 – मित्रांनो संपूर्ण राज्यभरात तलाठी भरतीची खूप चर्चा होऊन राहिली. तलाठी भरती ही महसूल विभाग मार्फत करण्यात येते. पुढील काही दिवसात तलाठी भरती होणार आहे असं महसूल विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांचे या भरतीवर विशेष लक्ष आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तलाठी या पदाचे अधिकृत नवीन नाव “ग्राम महसूल अधिकारी” देण्यात असून, तरीही राज्यभरात तलाठी या नावाने प्रसिद्ध आहे. तलाठी हे पद ग्रामपातळीवर खूप महत्त्वाच आहे. कारण जमीन मोजणी, महसूल प्रकरणे आणि नागरिक सेवा यांसारखी जबाबदारी त्यांच्या कडे दिली जाते.

सध्या या भरतीच्या जीआर मध्ये सांगितल्याप्रमाणे 2433 जागांसाठी भरती होणार आहे, आणि लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मागील तलाठी भरती 2023 मध्ये 4644 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ही परीक्षा ऑनलाइन CBT पद्धतीने पार पडली होती. आयबीपीएस किंवा टीसीएस च्या मार्फत घेतली गेली होती. यावर्षी TCS आणि तत्सम एजन्सी मार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे.

मित्रांनो, तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगण्यात येणार आहे की तलाठी कसं बनायचे? यांविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि यामध्ये शिक्षण पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि महत्त्वाचे पुस्तके अशी बरीच माहिती नमूद केली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्ही सुरुवात पासून ते शेवटपर्यंत संपूर्ण आर्टिकल वाचा. कारण तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर या आर्टिकल मध्ये दिले आहे. त्यामुळे एकही शब्द न वाचता सोडू नका.

Table of Contents

Talathi Bharti 2025 Details – संपूर्ण माहिती

भरतीचे नावतलाठी भरती (ग्राम महसूल अधिकारी)
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
पगार₹25,500 ते ₹81,100 पर्यंत
अधिकृत वेबसाईटhttps://mahabhumi.gov.in/
व्हाट्सअप चॅनल जॉईन व्हा

Talathi Bharti 2025 Qualification & Eligibility – पात्रता निषक

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार हा मान्यप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी पास झालेला असावा. (उदा, B.sc, BBA, B.A, B.Pharmacy, B.Com, BCA, BE, B.Tech, B.Sc Nursing इ.)
  • यामध्ये मान्यप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असणं आवश्यक आहे (कोणत्याही विशिष्ट विषयाची अट दिलेली नाही)
  • मुक्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी घेतली असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकतात

संगणक ज्ञान –

  • उमेदवारकडे MS-CIT चा कोर्स करणे आवश्यक आहे (MS-CIT प्रमाणपत्र तुम्हाला जॉईन केल्याच्या 2 वर्षानंतर जमा करायचा आहे
  • जर तुम्ही MSCIT Equivalent Certificate, DOEACC, NIELIT, Government Reconized Computer Course झाले असतील तर तरीही चालेल.

महत्त्वाचे पात्रता अटी

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
  • उमेदवाराला मराठी वाचता आणि लिहिता आली पाहिजे
  • शिक्षण अहर्ता ही अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेआधी पूर्ण झालेली असावी तरच अर्ज करता येईल.

Age Limit – वयाची अट

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. जर उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला अर्ज करता येणार नाही

यामध्ये मागासवर्गीय आणि प्रवर्गासाठी वयामध्ये सूट दिलेली आहे (मागील भरती प्रमाणे 5 वर्षाचे सूट दिली होती)

Sallary – पगार

  • मूळ वेतन ₹25,500 ते ₹81,100/- (Level 5 – 7 Pay Commission नुसार इतका आहे)

भत्ता / घटकमाहिती
मूळ वेतन₹.25,500/- पासून सुरू
DA (महागाई भत्ता)केंद्र सरकारनुसार दर सहा महिन्यांनी बदलत राहतो
TA (वाहन भत्ता)शहर आणि गाव यावर अवलंबून असतं
HRA (घरभाडे भत्ता)पोस्टिंग क्षेत्रानुसार 8% ते 16% राहते
Deduction (कट)PF, Professional Tax, Pension

Talathi Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

तलाठी भरतीची निवड तीन टप्प्यात केली जाते, जे खाली दिले आहेत

1) Written Exam – परीक्षा चाचणी (ऑनलाइन)

  • परीक्षा चाचणीमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात
  • एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी राहतात
  • प्रत्येक एक प्रश्न 2 गुणासाठी राहतो
  • परीक्षेच्या कालावधीत 2 तास म्हणजेच 120 मिनिटे आहे
  • Negative Marking नाही
  • मराठी आणि इंग्लिश या दोन माध्यमांमध्ये परीक्षा राहील

अ.क्र विषयप्रश्नगुणवेळ
1मराठी2550
2इंग्रजी2550
3गणित आणि बुद्धिमत्ता2550
4सामान्य ज्ञान2550
एकूण1002002 तास

2) Interview – मुलाखत

ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवले जाईल. ज्यात तुम्हाला मुलाखत मध्ये महाराष्ट्र भूमी, जमीन कायदे, गावातील समस्या, प्रकाशकीय कार्यपद्धती आणि तुमच्या भागातील स्थानिक मुद्दे यांवर प्रश्न विचारले जातात. (त्यामुळे मुलाखत ची सुद्धा प्रॅक्टिस करत रहा)

3) Document Verification – कागदपत्रे पडताळणी

जर उमेदवार मुलाखत मध्ये पात्र असेल तर त्याला शेवटी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते. जर उमेदवार कडे विचारलेले कागदपत्रे जर योग्य असतील तर त्याला अंतिम निवड यादीसाठी पात्र ठरवले जाईल.

Talathi Bharti 2025 Syllabus – अभ्यासक्रम

मराठी भाषा –

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • वाक्यप्रचार
  • काळ (Tenses)
  • योग्य शब्दांची निवड
  • वाक्यरचना
  • अलंकार, समास, छंद
  • वाक्यातील चुका ओळखणे
  • उपसर्ग व प्रत्यय
  • म्हणी व वाक्यप्रचार
  • वाच्य
  • अव्यय, क्रियापदाचे प्रकार
  • संधी आणि विग्रह

इंग्रजी भाषा –

  • Parts of Speech (Noun, Pronoun, Verb, Adjective, Adverb, Prepositions, Conjunction)
  • Articles (a, an, the)
  • Synonyms & Antonyms
  • Tenses
  • Idioms and Phrases
  • Sentence Correction
  • One Word Substitution
  • Spot the Error
  • Reading Comprehension
  • Fill in the Blanks
  • Vocabulary Based Questions

बौद्धिक चाचणी / गणित

1) बुद्धिमत्ता

  • अंकमालिका
  • वेगळ्या शब्द व अंक ओळखणे
  • समसंबंध – अंक
  • अक्षर
  • अक्षर मालिका
  • आकृती
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृत्या

2) गणित –

  • घन आणि घनमुळे
  • चौरस आणि चौरस मुळे
  • संख्यात्मक मालिका
  • नफा आणि तोटा
  • टक्केवारी सरासरी
  • साधे व्याज
  • वेळ आणि काम
  • दशांश प्रणाली
  • घन, घनदाट, त्रिकोण, आयात, चौरस, गोल, वर्तुळ इ.चे क्षेत्रफळ
  • सरलीकरण
  • संख्या प्रणाली
  • मिश्रण
  • चक्रवाढ व्याज
  • बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार
  • वयानुसार समस्या
  • LMC आणि HCF

सामान्य ज्ञान

  • महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहास
  • भारतीय संस्कृती
  • चालू घडामोडी
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळ
  • पंचायती राज आणि भारताचे संविधान
  • सामान्य विज्ञान
  • जिल्ह्यांच्या भूगोल
  • बँकिंग जागरूकता
  • संगणक जागरूकता

Talathi Recruitment Previous Year Cutt-Off – मागील वर्षाच्या कट ऑफ

अ.क्रप्रवर्गकट-ऑफ गुण
1General 172 – 180 गुण
2OBC170 – 176 गुण
3EWS168 – 176 गुण
4SC160 – 168 गुण
5NT160 – 168गुण
6VJ160 – 168 गुण
7ST150 – 162 गुण

Talathi Bharti 2025 Document – आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड / पॅन कार्ड
  2. अर्जदाराची सही
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
    • पदवी प्रमाणपत्र
    • MS-CIT प्रमाणपत्र
  5. जन्म प्रमाणपत्र
  6. जात प्रमाणपत्र
  7. अर्जदाराचा मोबाईल नंबर
  8. ई-मेल आयडी
मित्रांनो जर तुम्ही आयटी पास असेल तर तुम्हाला NCR भरती मध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज करू शकतात – इथे क्लिक करा

तलाठी भरती 2025 साठी सोप्या भाषेत सर्वोत्तम पुस्तके

  • Ignite Publication टोटल भरती 2025 – या पुस्तकात तुम्हाला 2023 च्या तलाठी परीक्षेत सर्व 57 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचे उत्तरासह उपलब्ध आहे, जे IBPS/TCS च्या पॅटर्ननुसार तयार केलेले आहेत.

  • टार्गेट तलाठी 25000+ B Publication – या पुस्तकामध्ये तुम्हाला 25000+ प्रश्न आणि स्पष्टीकरण मिळून जातील, ज्यात मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचाही समावेश आहे

विषयपुस्तकचे नावलेखक & प्रकाशक
मराठी1) परिपूर्ण मराठी व्याकरण
2) सुगम मराठी व्याकरण
1) बाळासाहेब शिंदे
2) मो. रा. वाळिंबे
इंग्रजी1) संपूर्ण इंग्रजी व्याकरण
2) English Gramar
3) Objective General English
1) बाळासाहेब शिंदे
2) Pal and Suri
3) S.P. Bakshi
बुद्धिमत्ता आणि गणित1) बुद्धिमत्ता चाचणी
2) संपूर्ण गणित – स्पर्धा परीक्षा
3) 5 ते 12 वी पर्यंत चे पुस्तक
1) अनिल अंकलगी
2) पंढरीनाथ राणे
3) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ
सामान्य ज्ञान1) सामान्य ज्ञान1) Lucent’s

Talathi Bharti 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न?

1) तलाठी भरती 2025 केव्हा जाहीर होणार आहे?

ऑक्टोंबर च्या शेवट पर्यंत भरती जाहीर होण्याच्या शक्यता आहे

2) तलाठी भरती 2025 साठी किती रिक्त पदे भरणार आहेत?

सांगितल्याप्रमाणे 2433 रिक्त जागा भरले जाणार आहे

3) तलाठी भरती 2025 साठी वयोमर्यादा किती राहील?

तलाठी भरतीसाठी 18 ते 38 वर्षे (वयामध्ये सूट दिली जाईल)

4) तलाठी भरती निवड प्रक्रिया कशी आहे?

तलाठी भरतीसाठी निवड प्रक्रियेत 3 स्टेप राहतील
1) परीक्षा चाचणी (ऑनलाईन)
2) मुलाखत
3) कागदपत्रे पडताळणी

5) तलाठी भरती 2025 मध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवारने मान्यप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
नोकरी लागल्यानंतर दोन वर्षांनी MS-CIT प्रमाणपत्र मागितले आहे

6) तलाठी भरतीची अधिकृत वेबसाईट कोणती आहे?