NPCIL Bharti 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध जाहीर करण्यात आली आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती साठी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. भरती साठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात येत आहे.
NPCIL भरती मध्ये डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर हिंदी ट्रांलेटर या पदासाठी होत असून या नोकरी मध्ये चांगला पगार आणि सुविधा देखील मिळते. त्यामुळे ही संधी सोडू नका.
या भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपाने अर्ज मागविण्यात येत असून यासाठी 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण भरतीबद्दलची संपूर्ण माहिती पात्रता वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर पूर्ण माहिती वाचा आणि वेळेवर तुमच्या अर्ज सादर करा.
NPCIL Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025 |
| पदाचे नाव | विविध पदे |
| रिक्त जागा | 122 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वेतनश्रेणी | ₹.35,400 ते ₹.86,955 पर्यंत (इतर भत्ते) |
| शैक्षणिक पात्रता | MBA, MSW, इंजीनियरिंग पदवी आणि डिप्लोमा |
| वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2025 |
| निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्रे पडताळणी |
NPCIL Bharti 2025 Post & Vacancy – उपलब्ध पदे आणि जागा
| अ.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|---|
| 1 | डेप्युटी मॅनेजर (F&A) | 48 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (HR) | 31 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर (C&MM) | 34 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर (Legal) | 01 |
| 5 | जूनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) | 08 |
| * | एकूण | 122 |
NPCIL Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| डेप्युटी मॅनेजर (F&A) | (i) 60% गुणांसह कोणत्या शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदवीधर पदवी किंवा CA, CMA, CFA |
| डेप्युटी मॅनेजर (HR) | (i) किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा MSW |
| डेप्युटी मॅनेजर (C&MM) | (i) इंजिनीअरिंग पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी |
| डेप्युटी मॅनेजर (Legal) | (i) 60% गुणांसह LLB (ii) 03 वर्षे अनुभव |
| जूनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) | (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव |
Age Limit (वयाची अट)
| पद क्र. 1 ते 4 | 18 ते 30 वर्षे |
| पद क्र. 05 | 21 ते 30 वर्षे |
| OBC | 03 वर्षे सूट |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
Application Fee (अर्जाची फी)
| श्रेणी | फी |
|---|---|
| SC/ST/ExSM/PWD/महिला | फी नाही |
| पद क्र. 1 ते 4 (Gen/OBC/EWS) | ₹.500/- |
| पद क्र. 05 (Gen/OBC/EWS) | ₹.100/- |
Sallary (वेतनश्रेणी)
| पदाचे नाव | वेतन मॅट्रिक (Level) | वेतन मॅट्रिक्समध्ये पगार | महागाई भत्ता पगाराच्या 55% (01 जानेवारी 2025 पासून प्रभावी) | अंदाजे मासिक वेतन पगार + महागाई भत्ता |
|---|---|---|---|---|
| डेप्युटी मॅनेजर (HR/F&A/C&MM/Legal) | Level 10 | ₹.56,100/- | ₹.30,855/- | ₹.86,955/- |
| जूनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) | Level 06 | ₹.35,400/- | ₹.19,470/- | ₹.54,870/- |
NPCIL Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
डेप्युटी मॅनेजर आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी निवडणुकीचा टप्पा वेगळा असतो.
1) डेप्युटी मॅनेजर (HR/F&A/C&MM/Legal) निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- वैयक्तिक मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
2) ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) निवड प्रक्रिया
- प्राथमिक लेखी परीक्षा
- प्रगत चाचणी
- कागदपत्रे पडताळणी
NPCIL Bharti 2025 Exam Pattern – परीक्षा नमुना
Deputy Manager – (उपव्यवस्थापक)
Stage I – ऑनलाइन लेखी परीक्षा
- कालावधी – 120 मिनिटे
- प्रश्न – 120 (दोन भाग मध्ये असतात खाली दिलेल्या नुसार)
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील (1/4 निगेटिव्ह मार्किंग)
Part I (भाग 1) – Management Aptitude (व्यवस्थापनाची योग्यता)
- परीक्षेच्या कालावधी 120 मिनिट राहतो
- एकूण 50 प्रश्न राहतील
Syllabus – अभ्यासक्रम (50 प्रश्न)
|
Part II (भाग 2) – Professional Discipline (व्यावसायिक शिस्त)
Syllabus – अभ्यासक्रम (70 प्रश्न)
|
Qualifying Standard (पात्रता मानक)
- राखीव (UR) उमेदवार : 40% गुण
- राखीव प्रवर्गातील उमेदवार : 30% गुण
Stage II – वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
- लेखी परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना 1:4 च्या प्रमाणात वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- 48 रिक्त पदांसाठी अंदाजे 192 उमेदवारांची निवड केली जाईल
- मुलाखत गुण : 100
- राखीव (UR) उमेदवार : 60%
- राखीव प्रवर्गातील उमेदवार : 50%
Junior Hindi Translator – कनिष्ठ हिंदी अनुवादक
Stage I – प्राथमिक चाचणी
- परीक्षा ही संगणक आधारित चाचणी (MCQ) पद्धतीने होते
- एकूण प्रश्न : 50
- गुण : 150
- कालावधी : 120 मिनिटे
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिला जाईल
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी -1 गुण वजा केले जातील
| अ.क्र | विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|---|
| 1 | General Hindi | 20 | 60 |
| 2 | General English | 20 | 60 |
| 3 | General Knowledge / Mathematics / Analytical Reasoning | 10 | 30 |
| * | एकूण | 150 | 150 |
Qualifying Standard (पात्रता मानक)
- सामान्य श्रेणी (UR/EWS) : 30% गुण
- SC/ST/OBC(NCL)/PwBD : 20% गुण
Stage II – प्रगत चाचणी (Advanced Test)
स्टेज 1 मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार प्रगत चाचणीसाठी पात्र असतील. ही चाचणी 2 तासांची असेल आणि जास्तीत जास्त 150 गुणांची असेल.
प्रगत चाचणी वर्णनात्मक प्रकारची असेल आणि त्यात खालील विषयांचा समावेश असेल:
- दोन परिच्छेदांचे हिंदीतून इंग्रजीत आणि दोन्ही इंग्रजीतून हिंदीत भाषांतर –
- वाक्ये आणि मुहावरे यांचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर
- इंग्रजी शब्दांचे हिंदी समतुल्य शब्द
- इंग्रजी किंवा हिंदीमध्ये सारांश लिहिणे
- इंग्रजीमध्ये परिच्छेद लेखन
- हिंदी निबंध
Qualifying Standard (पात्रता मानक)
- सामान्य श्रेणी (UR/EWS) : 30% गुण
- SC/ST/OBC(NCL)/PwBD : 20% गुण
NPCIL Bharti 2025 Important Dates – महत्त्वाचा तारखा
| अर्ज सुरुवात | 07 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2025 |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
NPCIL Bharti 2025 Document – महत्वाचे कागदपत्रे
- आधार कार्ड/ पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराची सही (Scanned)
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- जन्म प्रमाणपत्र
- शैक्षणिक गुणपत्रिका (10th, 12th)
- पदवी प्रमाणपत्र
- Category प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Benefits of Working at NPCIL – काम करण्याचे फायदे
- भारत सरकार अंतर्गत नोकरीची सुरक्षा
- आकर्षक पगार आणि भत्ते
- वैद्यकीय आणि विमा संरक्षण
- पेन्शन फायदे (नियमांनुसार)
- मजबूत कर्मचारी कल्याण व्यवस्था
- पदोन्नती (Promotions) आणि विभाग परीक्षेद्वारे वाढ
How to Apply Online For NPCIL Bharti 2025 – अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी वरती दिलेली सर्व माहिती वाचा
- खाली Apply Now वर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन करा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून
- रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा
- तिथे एक फॉर्म Open होईल, मग तिथे विचारलेली माहिती व्यवस्थित भरा (शैक्षणिक, स्वतःबद्दल)
- त्यानंतर सांगितलेले सर्व Documents Scanned करून Upload करा
- मग तुमच्या Category नुसार अर्जाची फी (Pay) भरा
- एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या आणि चूक आढळल्यास दुरुस्त करून घ्या
- शेवटी अर्ज Form ला Submit करा
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा
NPCIL Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक्स
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| अर्जाची लिंक | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| Whatsapp चॅनल | Join व्हा |
| आरोग्य विभाग मध्ये 1440 जागांची नवीन भरती | इथून करा अर्ज |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





