Maharashtra Police Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी 15,500+ पेक्षा जास्त विविध जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पोलीस शिपाई, कारागृह पोलीस, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस बॅन्डस्मन आणि पोलीस शिपाई SRPF या जागांसाठी तुम्ही फॉर्म टाकू शकतात. या भरतीमध्ये हजारो मुलांचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण या भरतीच्या अभ्यासक्रम, महत्त्वाचे पुस्तके, मागील वर्षाच्या कट ऑफ यांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती वाचा. मगच अर्ज करा.
Maharashtra Police Bharti 2025 Exam Pattern – परीक्षा नमुना
- एकूण 100 गुणांची परीक्षा होत असते
- एकूण 100 प्रश्न असतात
- मराठी भाषेमध्ये होणार परीक्षा
- पेपर साठी तुम्हाला 90 मिनिटच्या कालावधी मिळेल
- वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न राहतील
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 | 25 |
| मराठी व्याकरण | 25 | 25 |
| गणित | 25 | 25 |
| बौद्धिक चाचणी | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
Maharashtra Police Bharti 2025 Syllabus – अभ्यासक्रम
1) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
इतिहास – History
- भारताचे व्हाईसरॉय
- समाज सुधारक
- राष्ट्रीय सहभाग
- 1857 च्या उठाव
- भारतीय स्वतंत्र लढा
- ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
- 1909 कायदा
- 1919 कायदा
- 1935 कायदा
- हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
भूगोल – Geography
- महाराष्ट्राच्या भूगोल
- भारताच्या भूगोल
पंचायतराज – Panchayatraj
- घटना दुरुस्ती
- ग्राम प्रशासन
- ग्रामसेवक
- ग्रामसभा व ग्रामपंचायत
- ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन
- पंचायत समिती
- जिल्हा परिषद
- समिती व शिफारसी
- महानगरपालिका
- नगरपरिषद / नगरपालिका
- मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
- गट विकास अधिकारी BDO
सामान्य विज्ञान – General Science
- शोध व त्यांचे जनक
- विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
- शास्त्रीय उपकरणे व त्यांच्या वापर
- शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
राज्यघटना – Polity
- भारताची राज्यघटना
- विधानसभा
- लोकसभा
- राज्यसभा
- राज्यपाल
- राष्ट्रपती
- पंतप्रधान
- उपराष्ट्रपती
- संसद
- मुख्यमंत्री
- परिशिष्टे
- विधान परिषद
- मूलभूत अधिकारी
- मूलभूत कर्तव्य
- मार्गदर्शक तत्वे
चालू घडामोडी – Current Affairs
- विकास योजना
- संपूर्ण विकास योजना
पुरस्कार – Award
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार (International)
- राष्ट्रीय पुरस्कार (Central)
- शौर्य पुरस्कार (Gallantry)
- महाराष्ट्राचे पुरस्कार (State)
- खेळासंबंधी पुरस्कार (Sports)
क्रीडा – Sports
- प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
- आशियाई स्पर्धा
- राष्ट्रकुल स्पर्धा
- क्रिकेट स्पर्धा
- महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
- खेळ व खेळाडूंची संख्या
- खेळ व खेळाशी संबंधित चषक
- खेळ संबंधी चिन्हे व प्रतीके
- खेळाचे मैदान व ठिकाण
2) मराठी व्याकरण – Marathi Grammar
- विरुद्धार्थी शब्द (Opposite)
- समानार्थी शब्द (Synonyms)
- मराठी वर्णमाला (Marathi Alphabets)
- संधी (Sandhi)
- लिंग (Grammatical Gender)
- नाम (Noun)
- सर्वनाम (Pronoun)
- वचन (Grammatical Number)
- काळ (Tense)
- क्रियापद (Verbs)
- समास (Compound)
- प्रयोग (Preposition)
- म्हणी (Adage)
- वाक्यप्रचार (Idiom)
3) गणित – Mathematics
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार (Simplification)
- संख्या व संख्यांचे प्रकार (Number System)
- पूर्णांक व त्यांचे प्रकार (Integers)
- अपूर्णांक व त्यांचे प्रकार (Fractions)
- म.सा.वी. आणि ल.सा.वी. (LCM and HCM)
- कसोट्या (Divisibility)
- घन व घनमूळ (Cube and Cubic)
- वर्ग व वर्गमूळ (Square and Square Root)
- शेकडेवारी (Percentage)
- गुणोत्तर व प्रमाण (Ratio Proportion)
- भागीदारी (Partership)
- सरासरी (Average)
- नफा तोटा (Profit, Loss)
- काळ, काम, वेग (Time, Work, Speed)
- सरळ व्याज व चक्रवाढ व्याज (Simple Compound Interest)
- घातांक व त्यांचे नियम (Surds and Indices)
- घड्याळ वर आधारित प्रश्न (Clock Reasoning)
- दशमान पद्धती (Decimal Dimension)
4) बौद्धिक चाचणी – Intellectual Test
- नाते संबंध (Relation Problem)
- व्हेन आकृत्या वर आधारित प्रश्न (Venn Diagram)
- अक्षर मालिका (Alphabet Series)
- संख्या मालिका (Number Series)
- सांकेतिक लिपी (Code Language)
- सांकेतिक भाषा (Sign Language)
- दिशावर आधारित प्रश्न (Direction Problem)
- घड्याळावर आधारित प्रश्न (Clock Reasoning)
- तर्कावर आधारित प्रश्न (Logical Reasoning)
Maharashtra Police Bharti 2025 Book List – पुस्तकांची यादी
• मराठी (Marathi)
| पुस्तक | लेखक |
|---|---|
| संपूर्ण मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे |
| सुगम मराठी व्याकरण | मो. रा. वाळंबे |
• सामान्य ज्ञान (General Knowledge)
| पुस्तक | लेखक |
|---|---|
| सामान्य ज्ञान ठोकळा | एकनाथ पाटील (तात्या) |
| कला शाखा घटक | के. सागर पब्लिकेशन |
• चालू घडामोडी (Current Affairs)
| पुस्तक | लेखक |
|---|---|
| चालू घडामोडी | देवा जाधवर |
| सिम्पलीफाइड Year Book | दिव्या महाले व बालाजी सुरणे |
• गणित (Mathematics)
| पुस्तक | लेखक |
|---|---|
| संपूर्ण गणित | पंढरीनाथ राणे |
| फास्टट्रॅक गणित (Fastract Maths) | सतीश वसे |
• बौद्धिक चाचणी (Intellectual Test)
| पुस्तक | लेखक |
|---|---|
| बुद्धिमत्ता चाचणी | 1. अनिल अंकलगी 2. नितीन महाले |
| फास्टट्रॅक बुद्धिमत्ता (Fastract) | सतीश वसे |
| महाराष्ट्र पोलीस भरती 2025 नवीन जाहिरात | अर्ज सुरु |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!




