LIC Bima Sakhi Yojana 2025 – महिलांसाठी LIC मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आली आहे. LIC कडून विमा सखी योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये महिलांना घरी बसून नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत LIC सोबत काम करण्याची आणि चांगला पगार मिळण्याची देखील सुवर्णसंधी आहे.
या योजनेच्या मुख्य उद्देश म्हणजे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम करून देणे. विशेष म्हणजे या योजनेसाठी महिलांना फक्त दहावी पास असणे गरजेचे आहे. म्हणजेच ज्या महिलांनी कमी शिक्षण घेतला आहे, ते देखील अर्ज करू शकतात. त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना एलआयसीच्या विविध योजनांबद्दल लोकांना माहिती देण्याचे काम सुद्धा दिले जाईल. त्यासाठी महिलांना चांगले मानधन सुद्धा मिळणार.
या आर्टिकल मध्ये या योजनेविषयी संपूर्ण माहिती, फायदे, अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे देखील खाली सविस्तर माहिती मध्ये दिली आहे. त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा आणि मगच अर्जला सुरुवात करा.
LIC Bima Sakhi Yojana 2025 Details
| विभाग | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | LIC बिमा सखी योजना |
| संस्था | भारतीय जीवन विमा निगम (LIC of India) |
| योजनेचा उद्देश | महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्याला सक्षम बनवणे |
| पदाचे नाव | MCA – Micro Insurance Agent |
| शैक्षणिक पात्रता | किमान 10वी पास असणे गरजेचे आहे |
| वयोमर्यादा | 18 ते 70 वर्षांपर्यंत |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| कामाचे स्वरूप | LIC च्या विविध योजनांबद्दल लोकांना माहिती देणे |
| पगार (स्टायपेंड) | 5,000 ते 7,000 रुपये पर्यंत |
| कामगिरीची अट | दरवर्षी किमान 24 पॉलिसी करणे |
| कालावधी | 3 वर्षे |
LIC Bima Sakhi Yojana 2025 Eligibility
LIC बिमा सखी योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील दिलेल्या पात्रता आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे
| पात्रता / अटी | तपशील |
|---|---|
| नागरिकत्व | उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे |
| लिंग (Gender) | किमान 10वी पास असणे |
| वयोमर्यादा | किमान 18 ते कमाल 70 वर्षे |
| कामाचा प्रकार | LIC च्या विविध प्रकारचे लोकांपर्यंत पोहोचवणे, तसेच नोंदणी करणे आणि पॉलिसी विक्री करणे |
| अपात्रता अटी | विद्यमान LIC एजंट, LIC कर्मचारी किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही |
| अर्जदाराच्या स्वभाव | स्वभाव आणि कौशल्य चांगले असणे, लोकांशी चांगलं बोलणे, लोकांशी संपर्क ठेवण्याची आवड असावी आणि जबाबदारीने काम करण्याची आवड असणे |
| अनुभव | नाही, परंतु विमा क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल |
LIC Bima Sakhi Yojana 2025 Benefits
खालील प्रमाणे योजनेचे प्रमुख फायदे दिले आहेत
- महिलांना LIC सोबत काम करताना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळेल
- 10वी पास असलेल्या महिलांना संधी
- महिलांना प्रशिक्षणासह स्टायपेंड दरमहा मिळेल
- प्रत्येक वर्षी ठराविक पॉलिसी पूर्ण केल्यास पुढील वर्षाचे स्टायपेंड सुरू राहील
- LIC सारख्या मोठ्या पॉलिसी संस्थेत अनुभव मिळण्याची आणि भविष्यात अधिक कमाईची संधी
| किमान पॉलिसी | प्रत्येक वर्षी 24 पॉलिसी पूर्ण करणे |
| पाहील्या वर्षाच कमिशन | बोनस कमिशन वगळता किमान 48,000 रुपये कमिशन मिळेल |
| वर्ष | स्टायपेंड |
|---|---|
| पहिले वर्ष | ₹7,000/- दरमहा |
| दुसरे वर्ष | ₹6,000/- दरमहा (पहिल्या वर्षातील किमान 65% पॉलिसी चालू असल्यास) |
| तिसरे वर्ष | ₹5,000/- दरमहा (दुसऱ्या वर्षातील किमान 65% पॉलिसी चालू असल्यास) |
LIC Bima Sakhi Yojana 2025 Step-by-Step Application Process
- सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या Apply लिंक वर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर तुम्हाला Application फॉर्म दिसेल
- अर्ज फॉर्म मध्ये तुमचं नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती योग्य प्रकारे भरा
- नंतर आवश्यक कागदपत्रे जसे की, वयाचा पुरावा, पत्ता पुरावा आणि शैक्षणिक प्रमाणपत्र यासारखे कागदपत्रे Upload करायचे आहे
- तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती एकदा तपासून घ्या
- तपासल्यानंतर “Submit” या बटनावर क्लिक करा
- तुमच्या अर्ज LIC डिपार्टमेंट कडे पाठवला जाईल, तुम्ही पात्रता अटीमध्ये असल्यास तुमची निवड केली जाईल
- तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा कालावधीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल आणि त्याच्यासोबत स्टायपेंड (मानधन) सुद्धा दिले जाईल
- तुमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही LIC एजंट म्हणून काम करू शकता
- पदवीधर महिलांना पुढे Development Officer होण्याची संधी मिळू शकते
LIC Bima Sakhi Yojana 2025 Important Links
| Online अर्ज करा | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट पाहा |
| व्हाट्सअप चॅनल (अपडेटसाठी) | जॉईन व्हा |
LIC Bima Sakhi Yojana FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
LIC बिमा सखी योजना म्हणजे काय?
LIC (Life Insurance Corporation of India) द्वारे सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे. ज्यामध्ये महिलांना मायक्रो इन्शुरन्स एजंट (MIA) म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. या योजनेचा माध्यमातून महिलांना रोजगार आणि प्रशिक्षण सोबत मानधन सुद्धा मिळते.
LIC बिमा सखी योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
या योजनेमध्ये केवळ महिलाच अर्ज करू शकतात, महिला उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे
LIC बिमा सखी योजनासाठी वयाची अट काय आहे?
किमान 18 वर्ष ते कमाल 70 वर्षांपर्यंत महिला अर्ज करू शकता
LIC बिमा सखी योजनेअंतर्गत दरमहा स्टायपेंड (मानधन) किती मिळेल?
प्रत्येक वर्षी स्टायपेंड कमी जास्त होते, यात 5 ते 7 हजार रुपये महिना पगार दिला जाईल
LIC बिमा सखी योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे?
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून सबमिट करावे
LIC बिमा सखी योजना पूर्ण वेळ नोकरी आहे का?
नाही, ही पूर्णवेळ नोकरी नसून फक्त एक स्टायपेंड आधारित प्रशिक्षण योजना आहे, ज्यात महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करायला मिळेल
| HDFC बँकेतर्फे 70 हजार रुपयाची शिष्यवृत्ती मिळेल! | अर्ज करा |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!




