Bank of Baroda Apprentice Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी अप्रेंटिस या पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती परमनंट नसून केवळ 12 महिन्यांचे कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच या भरतीत उमेदवारांना नोकरीची एक उत्तम सुवर्णसंधी आहे.
बँक ऑफ बडोदा भरती 2025 साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी 01 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना बँकेत काम करण्याची ही सुवर्णसंधी असून उमेदवारांना आकर्षक पगार आणि स्थिर नोकरीची चांगली संधी आहे.
त्यामुळे जे उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर पूर्ण करून बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी ही भरती खूपच महत्त्वाची आहे. या भरतीसाठी मराठी आणि इंग्रजी तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही संधी सोडू नका.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर पूर्ण माहिती वाचूनच आणि वेळेवर तुमच्या अर्ज सादर करा.
Bank of Baroda Apprentice Recruitment 2025 – संपूर्ण माहितीच्या आढावा
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | बँक ऑफ बडोदा भरती 2025 |
| पदाचे नाव | अप्रेंटिस |
| रिक्त जागा | 2700 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वेतनश्रेणी | ₹.15,000/- दरमहा |
| शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेतील पदवी |
| वयोमर्यादा | 20 ते 28 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2025 |
| निवड प्रक्रिया | Online लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, भाषा प्रवीणता चाचणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड यादी |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Post & Sallary – उपलब्ध पदे आणि पगार
| पदाचे नाव | रिक्त जागा | वेतनश्रेणी |
|---|---|---|
| अप्रेंटिस | 2700 | ₹.15,000 दरमहा |
Bank of Baroda Apprentice Bharti Category Wise Vacancies – श्रेणीनुसार रिक्त जागा
| श्रेणी | रिक्त जागा |
|---|---|
| SC | 412 |
| ST | 278 |
| OBC | 811 |
| EWS | 258 |
| UR | 941 |
| PwBD | 127 |
| एकूण | 2700 |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| अप्रेंटिस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे |
Age Limit (वयाची अट)
01 नोव्हेंबर 2025 रोजी, पर्यंत
| विभाग | तपशील |
|---|---|
| किमान | 20 वर्ष |
| कमाल | 28 वर्ष |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
| OBC | 03 वर्षे सूट |
Application Fee (अर्जाची फी)
| श्रेणी | फी |
|---|---|
| Gen/OBC/EWS | ₹.800/- |
| PwBD | ₹.400/- |
| SC/ST | फी नाही |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) Online लेखी परीक्षा (Written Exam)
- पहिला टप्पा हा संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा आहे
- ज्यामध्ये General/Financial Awareness, General English and Computer Knowledge, Quantitative & Reasoning Aptitude यांचा समावेश असतो
- ही परीक्षा 60 मिनिटांची असते आणि 100 प्रश्नांची एकूण संख्या 100 असते
- यात कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसते
2) दस्तावेज पडताळणी (Document Verification)
- ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
- ते मूळ प्रमाणपत्र असले पाहिजेत जसे की शिक्षणाचा पुरावा, ओळख, वयाचा पुरावा (लागू असल्यास)
- त्यामुळे सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत
3) भाषा प्रवीणता चाचणी (Language Proficiency Test)
- उमेदवारांनी अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेत संवाद कौशल्य दाखवण्यासाठी त्या भाषेतील चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
राज्यासाठी असलेल्या भाषांची यादी खालीलप्रमाणे आहे
| अ.क्र | राज्य / केंद्रशासित प्रदेश | स्थानिक भाषा (S) |
|---|---|---|
| 1 | आंध्र प्रदेश | तेलुगू / उर्दू |
| 2 | आसाम | आसामी / बंगाली / बोडो |
| 3 | बिहार | हिंदी / उर्दू |
| 4 | छत्तीसगड (केंद्रशासित प्रदेश) | हिंदी / पंजाबी |
| 5 | छत्तीसगड | हिंदी |
| 6 | दादरा आणि नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश) | गुजराती / कोकणी / मराठी |
| 7 | दिल्ली (केंद्रशासित प्रदेश) | हिंदी |
| 8 | गोवा | कोकणी |
| 9 | गुजरात | गुजराती |
| 10 | हरियाणा | हिंदी / पंजाबी |
| 11 | जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश) | उर्दू / हिंदी |
| 12 | झारखंड | हिंदी / संथाली |
| 13 | कर्नाटक | कन्नड |
| 14 | केरळ | मल्याळम |
| 15 | मध्य प्रदेश | हिंदी |
| 16 | महाराष्ट्र | मराठी |
| 17 | मणिपूर | मणिपुरी / इंग्रजी |
| 18 | मिझोरम | मिझो |
| 19 | पॉंडिचेरी (केंद्रशासित प्रदेश) | तमिळ |
| 20 | ओडिशा | ओडिया |
| 21 | पंजाब | पंजाबी / हिंदी |
| 22 | राजस्थान | हिंदी |
| 23 | तामिळनाडू | तमिळ |
| 24 | तेलंगणा | तेलुगू / उर्दू |
| 25 | उत्तर प्रदेश | हिंदी / उर्दू |
| 26 | उत्तराखंड | हिंदी |
| 27 | पश्चिम बंगाल | बंगाली / नेपाळी |
4) वैद्यकीय चाचणी (Medical Test)
निवडलेल्या प्रशिक्षणार्थींची नियुक्ती बँकेच्या आवश्यकतेनुसार त्याला वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त तपासणी बोलावले जाईल.
5) अंतिम निवड (Final Selection)
उमेदवारांना हे जाणून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे की अंतिम निवडीसाठी खालील गोष्टींचा समावेश असेल
- जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकष आणि इतर अटी आणि शर्ती पूर्ण करणे आवश्यक
- ऑनलाइन परीक्षेत किमान कट ऑफ गुण मिळवणे बँकेने निश्चित केले आहे
- ऑनलाइन अर्जात दिलेल्या जन्मतारीख, श्रेणी, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांशी संबंधित कागदपत्रांची यशस्वी पडताळणी केले जाईल
- संबंधित राज्यातील निर्धारित स्थानिक भाषा प्रवीणतेच्या चवीमध्ये पात्रता असणे
- बँकेच्या आवश्यकतांनुसार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित करणे
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Exam Pattern – परीक्षा नमुना
- ऑनलाइन परीक्षेच्या वस्तुनिष्ठ प्रकाराची रचना खालीलप्रमाणे असेल
- परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात
- प्रत्येक एक प्रश्न 1 गुणासाठी राहील म्हणजेच, एकूण – 100 gun
- परीक्षेसाठी कालावधी वेळ 1 तास (60 मिनिटे) राहतील
- या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते
- हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत प्रश्न विचारले जातील
| अ.क्र | विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|---|
| 1 | General English | 25 | 25 |
| 2 | General/Financial Awareness | 25 | 25 |
| 3 | Computer Knowledge | 25 | 25 |
| 4 | Quantitative & Reasoning Aptitude | 25 | 25 |
| * | एकूण | 100 | 100 |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Documents – महत्वाचे कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराचे सही
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी गुणपत्रक / प्रमाणपत्र)
- पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र
- अनुभव असलेले प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- वयात सूट असल्यास प्रमाणपत्र
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Important Dates – महत्त्वाचा तारखा
| अर्ज सुरुवात | 11 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2025 |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया
- सर्वात पहिले वरती दिलेली माहिती वाचा
- त्यानंतर खाली दिलेली Apply Now यावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून)
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (Username आणि Password वापरून)
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म उघडेल तिथे दिलेली सर्व माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती)
- मग विचारलेले सर्व Documents Scanned करून अपलोड करा
- त्यानंतर तुमच्या (Category) श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
- एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा
- शेवटी Form ला Submit करा
- म्हणजे Form ची प्रिंट काढून ठेवा
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक्स
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| अर्जाची लिंक | NATS : Apply Now NAPS : Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| WhatsApp चॅनल | Join व्हा |
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 मध्ये कोणते पदे भरली जाणार आहेत?
अप्रेंटिस (Apprentice) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 आहे.
Bank of Baroda Apprentice Recruitment साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?
या भरतीमध्ये एकूण रिक्त जागा या केवळ 2700 जागा उपलब्ध आहेत.
Bank of Baroda Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया मध्ये हे 5 टप्पे आहेत ज्यात Online Written Examination, Document Verification, Language Proficiency Test, Medical Examination, Final Selection List वर आधारित आहेत.
Bank of Baroda Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
अप्रेंटिस या पदासाठी स्टायपेंड मानधन ₹.15,000 मिळणार आहे.
Bank of Baroda Apprentice Bharti ही पर्मनंट नोकरी आहे का नाही?
बँक ऑफ बडोदा अप्रेंटिस भरती ही पर्मनंट नसून ही 12 महिन्यांसाठी कामाबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे.
| सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत 1440 जागांसाठी नवीन भरती निघाली आहे | इथून करा अर्ज |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





