AIIMS CRE Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नवीन जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. AIIMS (All India Institute of Medical Sciences) अंतर्गत ग्रुप B & C या पदासाठी नवीन जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये तुम्हाला महिन्याला चांगला पगार आणि सुविधा देखील उपलब्ध आहे.
या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी तुम्ही 02 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावीत. AIIMS मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी असून आजीबाद सोडू नका.
मित्रांनो या लेखात मध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची सर्व तपशिलांची सविस्तर माहिती बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असाल तर वेळेवर अर्ज सादर करा.
AIIMS CRE Bharti 2025 – संपूर्ण माहितीचा आढावा
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2025 (AIIMS) |
| पदाचे नाव | ग्रूप B & C (विविध पदे ) |
| रिक्त जागा | 1300+ |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वेतनश्रेणी | ₹19,900 ते 1,42,400 पर्यंत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी/12वी/ITI/पदवीधर (संपूर्ण माहिती खाली वाचा) |
| वयोमर्यादा | 25 ते 45 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 डिसेंबर 2025 |
| निवड प्रक्रिया | संगणक आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी |
AIIMS CRE Bharti 2025 Post & Sallary – उपलब्ध पदे आणि वेतनश्रेणी
| अ.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा | वेतनश्रेणी |
|---|---|---|---|
| 1 | Group B & C (सहाय्यक आहारतज्ज्ञ, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक अभियंता आणि इतर पदे) | 1300+ | 19,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना (Level 2 – 7) |
AIIMS CRE Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक
Education Qualification (शैक्षणिक पात्रता)
| पद | शैक्षणिक पात्रत | वयाची अट |
|---|---|---|
| सहाय्यक आहारतज्ज्ञ | M.Sc (Food & Nutrition) 2 वर्षाचा अनुभव | 35 वर्षे |
| सहाय्यक | कोणत्याही शाखेत किमान 3 वर्षांची बॅचलर पदवी (संगणकाचे कामाचे ज्ञान) | 21 ते 30 वर्षे |
| सहाय्यक प्रशासकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य / MBA/PG डिप्लोमा | 21 ते 30 वर्षे |
| कार्यकारी सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य | 21 ते 30 वर्षे |
| कनिष्ठ प्रशासन अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य | 21 ते 30 वर्षे |
| कार्यालयीन अधीक्षक | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी 2 वर्षांचा कामाचा अनुभव | 21 ते 30 वर्षे |
| कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक | 12वी पास संगणक टायपिंग गतीसाठी कौशल्य चाचणीचे निकष ( English : 30 w.p.m / Hindi : 35 w.p.m) | 18 ते 30 वर्षे |
| निम्न श्रेणी लिपिक | 12वी पास संगणक टायपिंग गतीसाठी कौशल्य चाचणीचे निकष ( English : 30 w.p.m / Hindi : 35 w.p.m) | 18 ते 30 वर्षे |
| वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य संगणकात प्रवीणता संगणक टायपिंग गतीसाठी कौशल्य चाचणीचे निकष ( English : 30 w.p.m / Hindi : 35 w.p.m) | 30 वर्षे |
| कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर 2 वर्षाचा अनुभव | 30 वर्षे |
| कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवीधर 2 वर्षाचा अनुभव | 30 वर्षे |
| तंत्रज्ञ सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून भाषण आणि श्रवण या विषयात B.Sc पदवी M.Sc भाषण आणि श्रवण क्षेत्रातील रुग्णालयात क्लिनिकल अनुभव | 21 ते 30 वर्षे |
| इलेक्ट्रिशियन | 10वी उत्तीर्ण इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील ITI डिप्लोमा प्रमाणपत्र 5 वर्षांचा व्यावहारिक अनुभव | 35 वर्षे |
| वायरमन / लाईन्समन (इलेक्ट्रिकल) | 10वी उत्तीर्ण ITI डिप्लोमा प्रमाणपत्र संबंधित ट्रेड 2 वर्षाचा अनुभव | |
| फार्मासिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून फार्मसीमध्ये डिप्लोमा फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत फार्मासिस्ट असावा. | 21 ते 27 वर्षे |
अजून इतर काही पदे आणि त्याची पात्रता आहेत (कृपया जाहिरात वाचावी)
Age Limit (वयाची अट)
02 डिसेंबर 2025 रोजी, पर्यंत
| वयोमर्यादा | 20/27/30/35/40/45 वर्षे |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
| OBC | 03 वर्षे सूट |
Application Fee (अर्जाची फी)
| General/OBC | ₹.3000/- |
| SC/ST/EWS | ₹.2400/- |
| PwBD | फी नाही |
AIIMS CRE Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) संगणक आधारित चाचणी (CBT)
- सर्व उमेदवारांसाठी ही ऑनलाइन परीक्षा अनिवार्य आहे
- यात 100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतात
- 90 मिनिटे कालावधी देण्यात येतो
- चुकीचा उत्तरासाठी 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे
- पात्रता गुण श्रेणीनुसार भिन्न असतात: UR/EWS: 44% / SC/ST: 30% / OBC: 30% (PwBD: 30%)
2) Skill Test (कौशल्य चाचणी)
- हा टप्पा फक्त काही विशिष्ट पदांसाठी लागू आहे ज्यांना व्यावहारिक किंवा तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे.
- ही परीक्षा पात्रता स्वरूपाची आहे आणि उमेदवारांची प्रत्यक्ष कौशल्य चाचणी घेण्यात येईल
3) Document Verification (कागदपत्रे पडताळणी)
- अर्ज केलेले मागील टप्प्यासाठी पात्र असलेले उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
- पदांच्या आवश्यकतांच्या पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे
4) Medical Examination (वैद्यकीय तपासणी)
- कागदपत्रे पडताळणी खेळलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल
- अंतिम निवड संस्था वाटपापूर्वीचा हा अंतिम निर्णय आहे
AIIMS CRE Bharti 2025 Important Dates – महत्त्वाचा तारखा
| अर्ज सुरुवात | 14 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 डिसेंबर 2025 |
| परीक्षेची तारीख | 22 ते 24 डिसेंबर 2025 (तात्पुरते) |
| कौशल्य चाचणी | नंतर कळविण्यात येईल |
AIIMS CRE Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी वरती दिलेली माहिती वाचा
- त्यानंतर खाली दिलेले Apply Now या वर क्लिक करा
- केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा (मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून)
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा (Username आणि Password टाकून)
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला एक Form उघडेल तिथे दिलेली सर्व माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक माहिती)
- मग विचारलेल्या सर्व Documents अपलोड करा
- त्यानंतर तुमच्या (Category) श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
- एकदा संपूर्ण Form तपासून घ्या आणि चूक असल्यास दुरुस्त करा
- शेवटी Form ला Submit करा
- अर्ज Form ची काढून ठेवा
AIIMS CRE Bharti 2025 Important Links – महत्वाचे लिंक्स
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| अर्जाची लिंक | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| WhatsApp ग्रुप | Join व्हा |
| AFCAT 01/2026 Bharti | अर्ज करा |
FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
AIIMS CRE Bharti 2025 मध्ये कोणते पदे भरली जाणार आहेत?
Group B & C (सहाय्यक आहारतज्ज्ञ, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ श्रेणी लिपिक, सहाय्यक अभियंता आणि इतर पदे)
AIIMS CRE Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
AIIMS CRE भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2025 आहे
AIIMS CRE Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
Written Examination, Skill Test, Document Verification, Medical Test
AIIMS CRE Bharti 2025 पदासाठी वेतन पगार किती आहे?
वेतन आयोगाच्या लेव्हल 2 ते 7 नुसार मासिक वेतन ₹19,900 ते ₹1,42,400 पर्यंत असेल.
AIIMS CRE Bharti 2025 साठी एकूण किती रिक्त जागा आहेत?
AIIMS CRE भरती मध्ये एकूण 1300+ जागा आहेत
AIIMS CRE Bharti 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?
Group B & C पदासाठी : 20 ते 45 वर्षांपर्यंत

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





