PSI Bharti 2025 jpg image

PSI Bharti 2025 Syllabus- पोलीस सब इन्स्पेक्टर अभ्यासक्रम पूर्णपणे मराठीत माहिती

PSI Bharti 2025 Syllabus : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात PSI ची भरती (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत केली जाते. ही परीक्षा एक अत्यंत स्पर्धात्मक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतली जाणारी PSI म्हणजेच Police Sub Inspector (पोलीस उपनिरीक्षक) महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची पदवी मानली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस उपनिरीक्षक हा अधिकारी पोलीस खात्यातील कमान पदांपैकी पहिला अधिकारी दर्जा दिला जातो. थेट लोकांची संवाद साधत, कायदा आणि गुन्हे उघडकीस आणणे, सुव्यवस्था राखणे आणि जबाबदारी सांभाळणे हे PSI चे प्रमुख कार्य आहे.

तर मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये PSI ची निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि पात्रता यांबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत, माहिती खूप महत्त्वाची आहे.

PSI Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक

PSI Bharti Education Qualification – शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. (बॅचलर Degree)
  • अंतिम वर्षाचा विद्यार्थी अर्ज करू शकतो, पण मुलाखतीपूर्वी उत्तीर्णतेचा पुरावा सादर केला पाहिजे

अटी –

  • भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • मराठी येत असले पाहिजे (वाचता, लिहिता, बोलता)

मानसिक आणि वैद्यकीय तंदुरुस्ती (Mental & Medical Fitness)

  • Colour Blindness, Flat Feet आणि Deformities नसायला नको
  • मानसिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक

PSI Bharti 2025 Age Limit – वयाची अट

General (खुला प्रवर्ग)19 ते 28 वर्षे
OBC (इतर मागास वर्ग)19 ते 31 वर्षे
SC (अनुसूचित जाती)19 ते 33 वर्षे
ST (अनुसूचित जमाती)19 ते 33 वर्षे
Ex-SM (माजी सैनिक)5 वर्षांपर्यंत सूट
Police Department (पोलिस विभाग)35 वर्षापर्यंत

PSI Bharti 2025 Section Process – निवड प्रक्रिया

1) प्राथमिक परीक्षा (Preliminary Examination)

  • Prilims ही एक MCQ टाईप परीक्षा होते
  • 100 प्रश्न 100 गुणांसाठी राहतात
  • परीक्षेसाठी कालावधी 1 तास मिळतो
  • चुकीचा उत्तरासाठी (निगेटिव्ह मार्किंग) प्रश्नाला 25% दंड किंवा एकूण गुणांचा 1/4 दंड मिळतो
  • Prelims ही परीक्षा गुणवत्ता यादीसाठी याचे मार्क्स वापरले जात नाही (ही फक्त Qualifier परीक्षा आहे)

विषयप्रश्नगुणभाषावेळ
सामान्य क्षमता चाचणी100100मराठी & इंग्रजी1 तास

सामान्य क्षमता चाचणी (General Ability Test)

  • चालू घडामोडी
  • नागरिकशास्त्र
  • भूगोल
  • इतिहास
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • शासकीय अर्थव्यवस्था
  • सामान्य विज्ञान
  • बुद्धिमापन चाचणी
  • अंकगणित

2) मुख्य परीक्षा (Mains Examination)

  • Mains परीक्षा ही दोन परीक्षांनी बनलेले असते
  • पेपर 1 सर्व पदांसाठी समान आहे, तर पेपर 2 विशिष्ट पदांसाठी आहे
  • दोघ पेपर 100 प्रश्न आणि 100 गणांचा राहतो
  • प्रत्येक एक पेपर 1 तसाचा असतो
  • लेखी परीक्षेत बहुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील
  • अनुत्तरीत प्रश्नांना नकारात्मक श्रेणी मिळत नाही
  • निगेटिव्ह मार्किंग सठी 0.25 गुण वजा करण्यात येथील

पेपरविषयप्रश्न गुणभाषावेळ
पेपर 1विभाग अ : मराठी
विभाग ब : इंग्रजी
विभाग क :सामान्य ज्ञान
50
30
20
100
60
40
मराठी आणि इंग्रजी1 तास
पेपर 2सामान्य अभियोग्यता चाचणी आणि स्थिती / विषय ज्ञान100200मराठी आणि इंग्रजी1 तास
*एकूण200400*2 तास

मराठी (Marathi)

  • व्याकरण
  • वाक्यरचना
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह
  • म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

इंग्रजी (English)

  • Grammar
  • Sentence Structure
  • Common Vocabulary
  • Use of Idioms and Phrases
  • Meaning And Comprehension of Passage

सामान्य ज्ञान (General Knowledge)

  • चालू घडामोडी
  • माहिती अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
  • संगणक व माहिती तंत्रज्ञान

  • बुद्धिमत्ता चाचणी
  • महाराष्ट्राच्या भूगोल
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • भारतीय राज्यघटना
  • मानवी हक्क व जबाबदाऱ्या
  • महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951
  • भारतीय दंड संहिता 1860
  • फौजदारी प्रक्रिया संहिता 1973
  • भारतीय पुरावा अधिनियम 1872

3) शारीरिक चाचणी (Physical Test)

पुरुषांसाठी शारीरिक पात्रता

उंची (Height)165 सेमी
छाती (Chest)79 सेमी + 5 सेमी फुगवून (84 सेमी)
धावणे (Run)800 मीटर (2 मिनिट 30 सेकंद)
लांब उडी (Long jump)3.8 ते 4.5 मीटर
पुल अप्स (Pull-ups)कमीत कमी 5-10 वेळा

महिलांसाठी शारीरिक पात्रता

उंची (Height)किमान 157 सेमी
धावणे (Run)800 मीटर (3 मिनिटे)
लांब उडी (Long jump)सुमारे 3 मीटर

4) मुलाखत (Interview)

  • जे विद्यार्थी शारीरिक चाचणीत पात्र ठरलेले असतील त्यांना मुलाखती साठी बोलावले जाईल
  • मुलाखतीसाठी 100 गुणाची राहील त्यापैकी 75 गुण पाडणे निश्चित आहे
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अभ्यासक्रमक्लिक करा