RRB JE Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती मंडळाकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदासाठी 2569 जागांची नवीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे विद्यार्थी इंजीनियरिंग डिप्लोमा, आणि B.Sc झाले आहेत त्यांना भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची चांगली सुवर्णसंधी आहे.
मित्रांनो या भरतीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला चांगल्या पगारांसह आणि चांगल्या सुविधा सुद्धा मिळतात. त्यामुळे भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची खूप जणांचे स्वप्न राहतं.
सर्व बाबतीत पात्र असलेले उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर 2025 आहे
या आर्टिकल मध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा, मगच अर्ज करा.
RRB JE Recruitment 2025 Overview
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | भारतीय रेल्वे भरती 2025 |
| पदाचे नाव | ज्युनियर इंजिनिअर आणि इतर पदे |
| रिक्त जागा | 2569 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| वयोमर्यादा | 18 ते 33 वर्ष |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| अधिकृत वेबसाईट | RRB |
RRB JE Bharti 2025 Post & Vacancies
| पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|
| 1) जूनियर इंजिनिअर 2) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट 3) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | 2569 |
| एकूण | 2569 |
RRB JE Bharti 2025 Eligibility Criteria
Education Qualification
- पद क्र. 1 : इंजीनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electronics / Electrical / Mechanical / Civil / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Industrial / Mechatronics / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Information / Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र. 2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे
- पद क्र. 3 : 45% गुणांसह B.Sc (Physics / Chemistry) पास असणे आवश्यक आहे
Age Limit
01 जानेवारी 2025 रोजी, पर्यंत
| वयाची अट | 18 ते 33 वर्ष |
| SC/ST | 05 वर्षे सूट |
| OBC | 03 वर्षे सूट |
Application Fee
| श्रेणी | फी |
|---|---|
| General/OBC/EWS | ₹.500/- |
| SC/ST/ExSM/EBC/ट्रान्सजेंडर/महिला | ₹.250/- |
RRB JE Bharti 2025 Selection Process
1) लेखी परीक्षा (Written Exam)
Stage : CBT – I
- एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतील
- परीक्षेच्या कालावधी 90 मिनिट राहतो
- निगेटिव्ह मार्किंग 1/3 आहे
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क | 25 | 24 |
| गणित | 30 | 30 |
| सामान्य जागरूकता | 15 | 15 |
| सामान्य विज्ञान | 30 | 30 |
| एकूण | 100 | 100 |
Stage : CBT – II
- एकूण 150 प्रश्न 150 गुणांसाठी असतील
- परीक्षेच्या कालावधी 120 मिनिटे राहतील
- निगेटिव्ह मार्किंग 1/3
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| सामान्य जागरूकता | 15 | 15 |
| भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र | 15 | 15 |
| संगणक आणि अनुप्रयोगांची मूलभूत माहिती | 10 | 10 |
| पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रणाची मूलभूत माहिती | 10 | 10 |
| तांत्रिक क्षमता | 100 | 100 |
| एकूण | 150 | 150 |
2) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
- वरील दोघं परीक्षा पास असेल तर उमेदवाराला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल
- यामध्ये तुमची शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी पुरावा आणि इतर कागदपत्रे तपासणी करण्यात येईल
- जर तुमचे कागदपत्रे योग्य नसतील तर तुम्हाला तिथेच बात केले जाईल त्यामुळे सर्व कागदपत्रे योग्य आणि सोबत राहू द्या
4) वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
- कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवारांना आवश्यक मानकांची पूर्तता करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारी वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी घ्यावी लागेल.
- जर उमेदवार या चाचणीमध्ये फिट असेल तर त्याला अंतिम निवड यादीसाठी पात्र ठरवतील
RRB JE Bharti 2025 Important Dates
| अर्ज सुरुवात | 31 ऑक्टोबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
RRB JE Bharti 2025 Document
- उमेदवाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासपोर्ट फोटो आणि सही
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, डिप्लोमा, B.E, B.Tech आणि B.SC)
- जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC, NCL, EWS)
- जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
RRB JE Bharti 2025 Step-by-step Online Apply
- सर्वात आधी संपूर्ण माहिती वाचून घ्या
- खाली दिलेल्या Apply Now वर क्लिक करा
- तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, रजिस्ट्रेशन करून लॉगिन करा
- लॉगिन करून फॉर्मवर विचारलेले संपूर्ण माहिती भरा (नाव, पत्ता आणि शैक्षणिक पात्रता)
- तिथे विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा
- त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा
- एकदा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या चूक आढळल्यास दुरुस्त करा
- शेवटी फॉर्म ला Submit करा
- अर्जाची प्रिंट काढून ठेवा
RRB JE Bharti 2025 Important Links
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| व्हॉट्सॲप चॅनल | जॉईन व्हा |
RRB JE Bharti 2025 – FAQ
RRB JE भरती 2025 मध्ये किती रिक्त जागा आहेत?
RRB JE भरती मध्ये एकूण 2569 जागा भरल्या जाणार आहेत
RRB JE भरती 2025 साठी वयोमर्यादा काय आहे?
वयाची अट – 18 ते 33 वर्ष (वयात सूट दिलेली आहे)
RRB JE भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा पासआउट असेल पाहिजे
RRB JE भरती 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?
30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
RRB JE भरती 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम निवड यादी
| RRB NTPC मध्ये नवीन भरती निघाली आहे | अर्ज करा |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





