SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 – विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण हा व्यक्तीच्या आणि राष्ट्राचा विकासासाठी एक मूलभूत पाया आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी स्वतःचा शिक्षण पुढे नेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत SBI सरकारी बँकेतून विद्यार्थ्यांसाठी योजना राबवली जात आहे.
State Bank of India (SBI) ची CSR विभाग असलेली SBI फाउंडेशन ने 2025 मध्ये “SBI Platinum Jubilee Asha Scholarship” ही एक मोठी शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे. ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर किंवा महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाच्या प्रवास पुढे नेऊ शकतील. या स्कॉलरशिप साठी अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2025 आहे.
एसबीआय प्लॅटिनम ज्युबिली आशा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात 75% गुण किंवा 7 CGPA मिळवणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही काही सवलत आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वेगवेगळ्या प्रकारची आहे, जसे ₹15,000 ते 20 लाख पर्यंत शिष्यवृत्ती खालील श्रेणी अंतर्गत दिली जाते.
- School Students
- Undergraduate Students
- Postgraduate Students
- Medical students
- IIT Students
- IIM Students
- Overseas Students
SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 – ओळख
“SBI Platinum Jubilee Asha Scholarship” म्हणजेच ‘आशा’ या नावाने सुद्धा ओळखली जाणारी शिष्यवृत्ती योजना आहे. जी SBI 90 वर्षांचा (Platinum Jubilee) उत्सवाच्या निमित्त सुरू केली गेली आहे. या योजनेला एसबीआय फाउंडेशन ने SBI ची CSR (Corporate Social Responsibility) ही संस्था हातभार देते. या वर्षी 2025-26 साठी, SBI ने ₹90 कोटी (Fund) निधी या शिष्यवृत्तीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये एकूण 23 हजार 230 विद्यार्थी या योजनेतून लाभ घेऊ शकतात.
SBI Platinum Jubilee Asha Scholarship Important Dates
| अर्ज करण्याची तारीख | 19 सप्टेंबर 2025 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 नोव्हेंबर 2025 |
SBI Platinum Jubilee Asha Scholarship Eligibility Criteria
- अर्ज करणारा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा
- अर्ज करणाऱ्या विद्यार्थीचे मागील वर्षाचे परीक्षेचे गुण किंवा CGPA किमान 75% गुण किंवा 7.0 CGPA आवश्यक असणे आहे
- SC/ST वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10% सूट दिली जाते – म्हणजेच 67.50% किंवा 6.30 CGPA इतके पात्र ठरते
- वार्षिक कुटुंब उत्पन्न – शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ₹.3 लाख पेक्षा जास्त नसावे आणि महाविद्यार्थ्यांसाठी (UG/PG/इतर) ₹.6 लाख पेक्षा जास्त नसावे
SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 For School Students
| निकष | तपशील |
|---|---|
| शाळेतील विद्यार्थी | 9 ते 12 वी |
| गुण | 75 % (SC/ST श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 10% सूट देण्यात आली आहे) |
| वार्षिक उत्पन्न | ₹3 लाख पेक्षा कमी |
| वार्षिक शिष्यवृत्ती | ₹.15,000 /- |
| नूतनीकरण | शिष्यवृत्तीचे नूतनीकरण दरवर्षी पूर्ण होणाऱ्या पात्रता निकषांवर आधारित राहील |
SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 College Students
| महाविद्यालयातील विद्यार्थी | UG/PG/IIT/Medical/IIM Students |
| गुण | 7.0 CGPA (SC/SC श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी 10% सूट देण्यात आली आहे) |
| वार्षिक उत्पन्न | ₹ 6 लाख पेक्षा कमी |
| वार्षिक शिष्यवृत्ती | ₹.15 हजार ते 20 लाख रुपये पर्यंत |
SBI प्लॅटिनम ज्युबिली आशा शिष्यवृत्ती रक्कम
| श्रेणी | शिष्यवृत्तीची रक्कम |
|---|---|
| School Students | वार्षिक 15 हजार पर्यंत |
| Undergraduate Students | वार्षिक 75 हजार पर्यंत |
| Postgraduate Students | वार्षिक 2 लाख 50 हजार पर्यंत |
| Medical Students | वार्षिक 4 लाख 50 हजार पर्यंत |
| IIT Students | वार्षिक 2 लाखांपर्यंत |
| IIM Students | वार्षिक 5 लाखांपर्यंत |
| Overseas Students | वार्षिक 20 लाखांपर्यंत |
SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड
- मागील शैक्षणिक वर्षाच्या मार्कशीट (10/12 वी UG/PG/Medical/IIT/IIM/Overseas)
- चालू वर्षाचे शुल्क पावती (fee receipt)
- चालू वर्ष प्रवेशाचे प्रमाणपत्र / बोनाफाईड सर्टिफिकेट / ऍडमिशन लेटर
- बँक खाते तपशील (अर्जदार / पालक) – खाते क्रमांक, IFSC कोड
- उत्पन्न दाखला / वार्षिक उत्पन्न कागदपत्रे (Form 16, Sallary Slips)
- अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
- जात प्रमाणपत्र (SC/ST इतर)
| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना | अर्ज करा |
How to Apply for SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025
- सर्वात पहिले SBI Asha Scholarship च्या अधिकृत पोर्टल भेट द्या
- त्यानंतर Apply Now वर क्लिक करा
- तुमच्या अर्जाची श्रेणीनुसार (School/PG/UG/Medical/इतर) निवडा
- नोंदणी किंवा लॉगिन करा (ई-मेल, मोबाईल नंबर किंवा गुगल खाते वापरून)
- त्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा – स्वतःबद्दल विचारलेली माहिती, शैक्षणिक माहिती आणि आर्थिक परिस्थिती
- विचारलेले कागदपत्रे अपलोड करा
- आणि शेवटी अटी-शर्ती वाचून स्वीकार करा
- संपूर्ण फॉर्मला पुनरावलोकन (संपूर्ण फॉर्म तपासून घ्या)
- आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा
- अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर, संपूर्ण माहिती पावतीची प्रिंट काढून घ्यावी
महत्त्वाची सूचना – अर्ज दरम्यान दिलेली माहिती व कागदपत्रे अचूक असणे अत्यावश्य आहे. जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो, त्यामुळे अचूक माहिती भरा.
महत्त्वाचे टिप्स –
- अर्ज करण्याची वेळ न लांबवता – मर्यादित वेळेत (15 नोव्हेंबर 2025) पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे
- कागदपत्रे आधी तयार ठेवा – (जसे, मार्कशीट उत्पन्न दाखला बँक माहिती स्कॅन करून ठेवा)
- अचूक माहिती द्या – (चुकीची / अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो)
- प्रत राखून ठेवा
- पात्रता आणि शिष्यवृत्ती रक्कम तपासा – प्रत्येक कोर्स व श्रेणीसाठी लाभ वेगळा आहे
- नियमित अपडेट तपासा – SBI Foundation किंवा शिष्यवृत्ती पोर्टल वर अपडेट येऊ शकतात
निष्कर्ष –
SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025 ही एक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि महत्त्वाकांशी योजना आहे. या योजनाद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींनी अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्याची संधी देते. ही शिष्यवृत्ती योजना विविध रक्कम मध्ये आणि विशेष वैशिष्ट्ये आहेत.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे अर्ज लवकरात लवकर करा. विचारलेले कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा.

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





