Savitribai Phule Aadhar Scholarship Yojana – विद्यार्थी मित्रांनो, ही योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे. या योजनेच्या उद्देश म्हणजे, ज्या वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत आहे. ही योजना राबवण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाचा पंडित दीनदयाल उपाध्यक्ष स्वयंम व सामाजिक न्याय विभागाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना चा इतर मागास वर्ग (OBC), अनुसूचित जाती (SC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आणि भटक्या जमाती (SBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारकडून 60 हजारची आर्थिक मदत दिली जाते. या पैशांच्या वापर करून विद्यार्थी स्वतःच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकतो.
विद्यार्थी मित्रांनो, या योजनेच्या मुख्य उद्देश, महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो, त्यामुळे लक्षात घेऊन सरकारने 60 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. या योजनेच्या लाभ कसा घ्यायचा, योजनेसाठी पात्रता आणि निषक काय आहेत, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी विद्यार्थी अर्ज कसा करू शकतात यांबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे हे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून आणि समजून घ्या.
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana Overview
| योजनेचे नाव | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना |
|---|---|
| योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
| योजनेची सुरुवात | 2025 |
| आर्थिक सहाय्य | ₹. 60 हजार रुपये |
| अर्ज प्रक्रिया | या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता |
| योजनेच्या लाभ घेण्यासाठी पात्रता | महाराष्ट्रातील OBC, VJNT, SBC प्रवर्गातील विद्यार्थी |
| अधिकृत वेबसाईट | website |
| हेल्पलाइन क्रमांक | ०२२-४९१-५०८०० |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 ची उद्देश
ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या उद्देश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे आहे. जे विद्यार्थी विविध कारणामुळे वस्तीगृहात किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि प्रवेश मिळाल्या नंतरही त्यांना शिक्षणाच्या पूर्ण खर्च भागवता येत नाही. अशा अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजने अंतर्गत सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी 60 हजार रुपये आर्थिक मदत करणे आहे.
या आर्थिक मदतीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक खर्च जसे की, अन्न निवास आणि इतर गरजा पूर्ण करण्यास मदत करणे आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींच्या चिंता न करता अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल. ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींच्या सामना न करता उच्च शिक्षण घेता येईल. या योजनेअंतर्गत राज्यभरातील 21600 विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये प्रति जिल्हा 600 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेसाठी लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 साठी पात्रता
ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणि लाभ घेण्यासाठी सरकारने विशिष्ट पात्रता निषक दिलेली आहे ते विद्यार्थ्यांना पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा
- अपंग श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी, 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सांकडून मिळणे बंधनकारक आहे
- अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे आणि त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे
- अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांद्वारे दिलेले अनाथत्त्व प्रमाणपत्र सादर करावा लागेल
- विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात किमान 75% उपस्थित राहणे बंधनकारक असेल
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे
- विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डवर लिंक करणे आवश्यक आहे
- अर्जदार विद्यार्थी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असल्यास आणि वस्तीगृहात किंवा भाड्याने घेतलेल्या खोलीत राहत असल्यास त्यांनाच पात्रता मिळेल
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 फायदे
- या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रतिवर्ष 60 हजार रुपये दिले जातील
- ही एक प्रकारची शिष्यवृत्ती योजना आहे, जी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करते
- या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक संबंधित साहित्य खरेदी करू शकतात
- विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खातेत DBT द्वारे रक्कम जमा केली जाईल
| अनु.क्र | खर्चाची बाब | भोजन बत्ता | निवास भत्ता | निर्वाह भत्ता | प्रति विद्यार्थी एकूण वार्षिक खर्च |
|---|---|---|---|---|---|
| 1 | मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम | ₹.32,000 | ₹.20,000 | ₹.8,000 | ₹.60,000 |
| 2 | इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क- वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम | ₹.28,000 | ₹.15,000 | ₹.8,000 | ₹.51,000 |
| 3 | इतर जिल्ह्यांचे ठिकाण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम | ₹.25,000 | ₹.12,000 | ₹.6,000 | ₹.43,000 |
| 4 | तालुक्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम | ₹.23,000 | ₹.10,000 | ₹.5,000 | ₹.38,000 |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025 आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बालनिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अनाथ श्रेणीसाठी अनाथ प्रमाणपत्र आणि अपंगासाठी अपंगत्व प्रमाणपत्र
- शाळा किंवा महाविद्यालयात नोंदणी दर गैरस्थानिक निवासस्थानावरील भाडे आणि निवासस्थानाची पुष्टी करणारे नोटरीकृत प्रतिज्ञापत्र
- 10वी आणि 12वी मुख्य मार्कशीट
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक
How to Apply for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
- सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचा समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल, जे तुमच्या ब्लॉक किंवा जिल्ह्यात असू शकते
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळवायचा
- आता हा अर्ज काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करा
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
- पूर्ण भरलेला अर्ज फॉर्म कार्यालयात जमा करायचा आहे
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल जी तुमच्याकडे ठेवा
- त्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल
- तुम्ही दिलेले संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला पात्रता ठरविण्यात येईल
- आणि तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल
| अधिकृत वेबसाईट | क्लिक करा |
| अर्ज करण्याची वेबसाईट | क्लिक करा |
| अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी सामील व्हा | जॉईन करा |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





