Thane Van Vibhag Bharti 2025 image jpg

Thane Van Vibhag Bharti 2025 | ठाणे वन विभाग भरती : 10वी पास झालेले अर्ज करा

Thane Van Vibhag Bharti 2025 – मित्रांनो दहावी पासवर वन विभाग मध्ये भरती निघाली आहे. जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक असतील, त्यांच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आणि हो तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. त्यामुळे ही मोठी संधी सोडू नका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीमध्ये वन विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुळात ही भरती कंत्राटी स्वरूपाची केली आहे, त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरीत काम करण्यासाठी चांगली संधी आहे.

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी 25 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकतात. तुमची इच्छा असेल तर हे आर्टिकल वाचून लवकरात लवकर अर्ज सादर करा.

Table of Contents

Thane Van Vibhag Bharti 2025 Notification – अधिसूचना

भरतीचे नावठाणे वन विभाग भरती 2025
पदाचे नावविविध पदे आहेत
पद संख्या 14 जागा
नोकरी ठिकाणठाणे
नोकरीची कालावधी11 महिने
वयोमर्यादा21 ते 40 वर्षे
अर्ज पद्धतऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2025
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Thane Van Vibhag Recruitment Posts & Vacancies – पदे आणि पद संख्या

अ.क्र पदाचे नावपद संख्या
1वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासक 02
2वास्तु विशारद01
3विधी सल्लागार01
4ग्राफिक डिझायनर01
5निसर्ग उपजीविका तज्ञ02
6रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर 07
एकूण14 जागा

Thane Van Vibhag Recruitment Qualification Criteria – पात्रता निकष

Education Qualification – शैक्षणिक पात्रता

1) वन्य जीवशास्त्र अभ्यासक –

  • पदवीधर विज्ञान शाखेत 60% गुणांसह पदवी पास असावा
  • यामध्ये वन्य जीवशास्त्र, वनस्पती शास्त्र, प्राणी शास्त्र आणि पर्यावरण शास्त्र या शाखेत प्राधान्य दिले जातील
  • कॅमेरा ट्रॅपिंग (GIS/GSP Mapping, Statistical Analysis) यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे
  • संगणकाचे कौशल्य असावे
  • उत्कृष्ट संभाष कौशल्य असावे
  • इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे
  • वन्यजीव, अभयारण्यबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे आणि नियम यांच्याबाबत महिती असावी
  • Wildlife Biologist म्हणून वन्यजीव क्षेत्रात यापूर्वी काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल, अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे

2) वास्तु विशारद –

  • उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठातून वास्तुविशारद पदवी 60% गुणांसह पास असणे आवश्यक आहे
  • वास्तुकला / लॅन्डस्केप आर्किटेक्चर मध्ये पदवी झालेले पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले
  • CaA (Council of Architecture India) येथे नोंदणी असावे
  • (AutoCAD, SketchUp, Revit) सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे
  • Architech म्हणून काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे
  • वन्यजीव, अभयारण्यबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे आणि नियम यांचे बाबत माहिती असणे आवश्यक आहे
  • इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे

3) विधी सल्लागार –

  • अर्जदार मान्यप्राप्त विद्यापीठातील कायदे पदवी (law) 60% गुणांसह पास असावा
  • कायदे संबंधित कागदपत्रे तयार करणे मध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे (pleadings, affidavits, appeals and petitions and agreements)
  • अर्जदार यांच्याकडे कमीत कमी 6 वर्षापर्यंत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे अथवा रायगड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये (सिविल आणि क्रिमिनल कोर्ट) काम केल्याचा अनुभव असावा
  • उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे
  • मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे
  • वन्यजीव, अभयारण्यबद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे आणि नियम यांच्याबाबत माहिती असावी
  • Legal Advisor (विधी सल्लागार) म्हणून वन्य जीव क्षेत्रात यापूर्वी काम केलेल्या व अनुभव असलेला उमेदवारास प्राधान्य दिले जाईल अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे.

4) ग्राफिक डिझायनर –

  • अर्जदार 60% गुणांसह ग्राफिक डिझाईन मध्ये पदवी केलेले असणे आवश्यक आहे (B.des, BFA)
  • संगणक हाताळाचे कौशल्य असावे (Adobe Photoshop, Auto Card, Illustrator, InDesign) यांसारख्या ग्राफिक डिझाईनच्या साधनांमध्ये प्राविण्य असावे
  • वन्यजीव, अभयारण्यबद्दल व वन विभाग हाणा-या विविध विकास आराखडे व विकास कामांबद्दल सखोल माहिती असावी
  • उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे
  • इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे
  • ग्राफिक डिझायनर म्हणून काम केलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत सादर करावे

5) निसर्ग उपजीविका तज्ञ –

  • अर्जदार किमान 60% गुणांसह विज्ञान शाखेत मास्टर डिग्री झालेला असावा
  • वन्यजीव, अभयारण्य बद्दल तसेच वन व वन्यजीव विषयक कायदे आणि नियम यांचे बाबत माहिती असणे आवश्यक आहे
  • ग्रामीण विकास, समाजशास्त्र, विनिकी, वनस्पती शास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरण शास्त्र या शाखेत प्राधान्य दिले जाईल
  • उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे
  • मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत उत्तम ज्ञान असणे
  • शासनाच्या विविध योजना (उदा, कॅम्पा, आदिवासी विकास, वनहक्क कायदा, CSR Project इ.) यांचे बाबत थोडक्यात माहिती असणे
  • Livelihood Expert म्हणून काम केलेल्या व अनुभव असलेला उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. सोबत अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे

6) रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर –

  • अर्जदार हा 10वी उत्तीर्ण असावा
  • त्याचे वय 21 ते 40 वर्षे असावे
  • अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम व क्षेत्रीय कामकाजास योग्य असावे
  • अर्जदार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नसावा
  • अर्जदार मुंबई, मुंबई उपनगर किंवा ठाणे येथील रहिवासी असावा
  • वन व वन्यजीव विभागात वन्य प्राणी बचाव कामांसंबंधी अनुभव असलेले उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल
  • चार चाकी वाहन चालविण्याच्या अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल

Post Wise Sallary – पदानुसार पगार

अ.क्रपदपगार
1वन्यजीव जीवशास्त्र अभ्यासक ₹.50,000/-
2वास्तु विशारद ₹.60,000/-
3विधी सल्लागार ₹.50,000/-
4ग्राफिक डिझायनर₹.35,000/-
5निसर्ग उपजीविका तज्ञ₹.40,000/-
6रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर ₹.15,000/-

Thane Van Vibhag Bharti 2025 Important Dates – महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख25 सप्टेंबर 2025
मुलाखतीची तारीख30 सप्टेंबर 2025 (11 वाजता)

Thane Van Vibhag Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया

ठाणे वनविभाग भरतीसाठी अर्जदारांची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील, त्यानंतर अर्जांची फेर तपासणी केली जाईल. जे उमेदवार निषकानुसार पात्र ठरतील. त्यांना मुलाखती साठी बोलावले जाईल. (अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरा)

मुलाखतसाठी आलेल्या उमेदवाराची पात्रता तपासली जाईल, त्यांना पदानुसार काही प्रश्न विचारले जातील. जर उमेदवाराने मुलाखतीमध्ये चांगले गुण मिळवले तर त्याला ठाणे वनविभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी निवड केले जाईल. (त्यामुळे उमेदवाराने चांगला सराव करावा)

Thane Van Vibhag Recruitment 2025 Step-by-step Offline Process – ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  1. सर्वात पहिले तुम्हाला ठाणे वन विभाग भरतीसाठी जी संपूर्ण जाहिरात माहिती दिली आहे ती वाचून घ्या
  2. जाहिरातिचा पीडीएफ मध्ये शेवटी जो फॉर्म दिला आहे त्याची प्रिंट काढून घ्या
  3. त्यानंतर फॉर्म मध्ये जी माहिती विचारलेली आहे, ती काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरून घ्या
  4. तुम्ही अर्जामध्ये भरलेली माहिती अचूक असणे आवश्यक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तपासून माहिती भरा
  5. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर विचारलेले सर्व कागदपत्रे ही सोबत जोडून घ्या
  6. त्यानंतर तुम्हाला वन विभाग भरतीसाठी विचारलेला पत्ता वर पोस्टाद्वारे अर्जाला पाठवायचं आहे (जो तुम्हाला खाली भेटून जाईल)
  7. जर तुम्हाला पोस्टाने अर्ज पाठवणे शक्य नसेल तर, तुम्ही अधिकृत ई-मेल द्वारे अर्ज आणि कागदपत्रे पाठवू शकतात
  8. या भरतीमध्ये कोणतेही परीक्षा होणार नाही आहे. त्यामुळे कोणीही अर्ज फी भरायची नाही, कोणतीही न फी भरता अर्ज सादर करू शकतात

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण

अर्ज पाठवण्याचा (मुलाखतीच्या) पत्ताउप वनसंरक्षक कार्यालय, (वन्यजीव) ठाणे, एल.बी.एस. मार्ग, तीन हात नाका, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२
ई-मेल आयडीdcfwlthane@gmail.com

Thane Van Vibhag Bharti 2025 Important Links – महत्त्वाचे लिंक्स

भरतीची अधिकृत वेबसाईटवेबसाईटला भेट द्या
जाहिरात PDF पहा जाहिरात वाचा
व्हाट्सअप चॅनल ( नवीन अपडेटसाठी)जॉईन व्हा

महत्वाची सूचना –

  • ठाणे वन विभाग भरतीसाठी सुरुवातीच्या 1 महिन्याचा कालावधी हा प्रशिक्षणासाठी असेल
  • सदर प्रशिक्षण कालावधीतील कामगिरी समाधानकारक दिसून आल्यानंतर आपली सेवा पुढे चालू ठेवण्यात येईल
  • ही शासकीय नोकरी नसून केवळ कंत्राटी पद्धतीने 11 महिन्यांचा करारावर नियुक्ती आहे
  • एखाद्या अर्जदाराच्या बाबतीत निकष शिथिल करण्याच्या अधिकार निवड समिती अध्यक्षांचा राहील
  • विना परवाना सलग 10 दिवस अनुपस्थित असणे ही बाब संबंधित पदावरचा हक्क गमावणारी असेल
  • कोणतेही कारण न देता नेमणूक नाकारण्याच्या पूर्ण अधिकार फक्त निवड समितीकडे राहील
  • शासकीय वाहनाने केलेल्या प्रवासाकरिता प्रवासभत्ता राहणार नाही

नोट – याबद्दल अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात संपूर्ण वाचावी

Thane Van Vibhag Bharti 2025 FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Q) Thane Van Vibhag Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?

ठाणे वन विभाग भरती मध्ये पात्रता 10वी पास, पदवीधर असणे आवश्यक आहे

Q) ठाणे वन विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे (ठाणे वन विभागाचा अधिकृत पत्त्यावर जो तुम्हाला वरती भेटून जाईल)

Q) ठाणे वन विभाग भरतीसाठी शारीरिक चाचणीमध्ये काय असते?

ठाणे वन विभाग भरती मध्ये अधिकृत जाहिरात मध्ये शारीरिक चाचणी साठी नमूद केलेले नाही

Q) ठाणे वन विभाग भरतीसाठी अर्ज फी किती आहे?

या भरतीत कोणतेही फी दिलेली नाही आहे (कोणतेही फी न देता अर्ज करू शकतात)

Q) ठाणे वन विभाग भरती मध्ये निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरतीमध्ये तुम्हाला मुलाखत द्वारे निवड केले जाईल (जो उमेदवार पदानुसार प्रश्नांचे उत्तर योग्य देईल त्याला अंतिम निवड साठी नमूद केले जाईल)

Q) ठाणे वन विभाग भरती मध्ये किती कालावधीसाठी नोकरी आहे?

या भरतीत उमेदवार फक्त 11 महिन्यासाठी नोकरी करू शकतो (जर उमेदवारांनी 11 महिन्यासाठी चांगले काम केलं तर त्याला 3 वर्षासाठी नोकरी केली जाईल)

मित्रांनो जर तुम्ही ITI पास असाल तर तुम्हाला NCR मध्ये अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करू शकतात.. इथून करा अर्ज