GMC Miraj Group D Bharti 2025 – नमस्कार मित्रांनो, GMC म्हणजेच Government Medical College येथे 10वी पास झालेले उमेदवारांसाठी गट ड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीसाठी फक्त पात्रता पाहिजे 10वी पास, त्यामुळे ही उत्तम संधी सोडू नका.
सदरची पूर्ण प्रक्रिया आर.बी.पी.एस या कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, 7 ऑक्टोंबर 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा
आपण या लेखनात भरतीची शैक्षणिक पात्रता, पदांची माहिती आणि अभ्यासक्रम, अर्ज कसा करायचा यावर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती वाचा

GMC Miraj Notification Overview
| भरतीचे नाव | GMC Miraj Bharti 2025 |
| पदाचे नाव | गट- ड |
| पद संख्या | 263 जागा |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| नोकरी ठिकाण | मिरज |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 7 ऑक्टोंबर 2025 |
| अधिकृत वेबसाईट | GMC |
GMC Miraj Group D Bharti 2025 Post Details
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| गट- ड विविध पदे | 263 |
GMC Miraj Group D Bharti 2025 Zone Wise Vacancies
| अ.क्र | संस्थेचे नाव | रिक्त पदांची संख्या |
|---|---|---|
| 1 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज | 47 |
| 2 | पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली | 128 |
| 3 | आरोग्य शिक्षण पथक, तासगांव | 08 |
| 4 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज | 80 |
| एकूण | 263 |
GMC Miraj Vacancy 2025 Qualification and Eligibility – पात्रता
Education Qualification –
- उमेदवार हा 6 जून 2017 च्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरिता लागू आहे)
- न्हावी या पदाकरिता केंद्राकडील ITI प्रमाणपत्र पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे
- सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरिता कमीत कमी एक वर्षाचे अनुभव असलेले प्रमाणपत्र अनिवार्य आहे
- प्रयोगशाळा परिचय पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC विज्ञान) उत्तीर्ण केलेली असावी
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
Age Limit –
- वयाची अट – 31 ऑगस्ट 2025 रोजी
- किमान – 18 वर्षे
- कमाल – 38 वर्षे
- वयाची सूट
- (मागासवर्गीय/अनाथ/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – 05 वर्षे सूट)
- (माजी सैनिक – 07 वर्षे सूट)
Application Fee –
| श्रेणी | फी |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹.1000/- |
| राखीव प्रवर्ग | ₹.900/- |
Sallary –
- महिन्याला पगार एकूण ₹.15,000 ते ₹.56,900 रुपये पर्यंत आहे
- कृपया जाहिरात पहावे पदानुसार पगार दिले आहे
GMC Miraj Vacancy Important Dates – महत्वाचा तारखा
| जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख | 22 ऑगस्ट 2025 |
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षेच्या दिनांक व कालावधी | नंतर उपलब्ध होईल |
GMC Group D Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) परीक्षा चाचणी (CBT) Computer Based Test –
- परीक्षा ऑनलाईन CBT पद्धतीने घेण्यात येईल
- परीक्षेच्या प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील
- प्रत्येक एक प्रश्नासाठी 2 गुण देण्यात येईल
- परीक्षा कालावधी 2 तास (120 मिनिटे) आहे
- Normalization पद्धती करून निकाल लावण्यात येईल
| अ.क्र | विषय | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| 1 | मराठी | 25 | 50 | – |
| 2 | इंग्रजी | 25 | 50 | – |
| 3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | – |
| 4 | बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित | 25 | 50 | – |
| एकूण | 100 | 200 | 2 तास |
2) कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी –
उमेदवार जर परीक्षा पास असेल तर त्याला कौशल्य चाचणी आणि शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल. कौशल्य चाचणी पदानुसार आहे. उमेदवार दोन्ही चाचणी मध्ये पास झाला, तर त्याला पुढील चाचणीसाठी बोलवले जाईल. उमेदवार जर दोन्ही चाचणी साठी पात्र नसेल तर त्याला बाद केलं जाईल.
3) कागदपत्रे पडताळणी –
वरील दोघ चाचणी झाल्यानंतर उमेदवाराला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. उमेदवाराकडे जर योग्य कागदपत्रे आहेत की नाही ते पाहिलं जाईल. योग्य नसतील तर उमेदवाराला अंतिम निवड यादीसाठी बाद करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्रे योग्य पद्धतीने सोबत ठेवावे.
4) अंतिम निवड प्रक्रिया –
उमेदवार वरील सर्व चाचणी पास असेल, तर त्याला अंतिम निवड यादी मध्ये पात्र ठरवण्यात येईल.
GMC Miraj Recruitment 2025 Syllabus – अभ्यासक्रम
मराठी भाषा –
- व्याकरण (वाक्यरचना, शब्द संग्रह, समास)
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाक्यप्रचार
- योग्य शब्द प्रयोग
- मराठी इंग्रजी भाषांतर
इंग्रजी भाषा – English Language
- Grammar (Noun, Pronoun, Adjective, Adverb)
- Tenses
- Synonyms and Antonyms
- Vocabulary
- Sentence Correction
- Comprehension Passage
सामान्य ज्ञान –
- चालू घडामोडी
- आर्थिक घडामोडी
- वर्तमान घडामोडी (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय)
- भारताच्या इतिहास व भूगोल
- महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोल
- आरोग्य / वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित माहिती
- भारतीय राज्यघटना व शासनव्यवस्था
- पर्यावरण व समाज विषयक प्रश्न
बौद्धिक (बुद्धिमत्ता) / अंकगणित –
बौद्धिक (बुद्धिमत्ता)
- सांकेतिक भाषा
- अंक व शब्द कोडी
- श्रेणी पूर्ण करा
- समानता व भिन्नता
- गणितीय तर्कशक्ती प्रश्न
- नमुन्यांची ओळख
- दिशा आणि अंतर
- वर्गीकरण
- सबंध ओळखणे
अंकगणित
- बेरीज, वजाबाकी
- गुणाकार, भागाकार
- प्रमाण व प्रणामभेद
- तक्ते व आलेखावर आधारित प्रश्न
- वेळ-अंतर-काम
- टक्केवारी
- नफा-तोटा
- सरासरी
- क्षेत्रफळ व घनफळ
- साधे व चक्रवाढ व्याज
GMC Miraj Recruitment Online Apply – अर्ज कसा करायचा?
- GMC च्या अधिकृत वेबसाईट वर जा (ज्याची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल)
- तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करा, जर अगोदर झालं असेल तर लॉगिन करा
- लॉगिन झाल्यानंतर तुमच्या बद्दल विचारलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरून घ्या
- माहिती भरल्यानंतर तिथे दिलेले कागदपत्रे अपलोड करा (अर्जदाराची सही, फोटो, प्रमाणपत्र)
- तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरून घ्या
- एकदा पुन्हा संपूर्ण फॉर्म तपासून घ्या, जर माहिती अचूक असेल तर दुरुस्त करा
- आणि शेवटी अर्ज सबमिट करा
- तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्यावी
GMC Miraj Group D Bharti 2025 Document – आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- अर्जदाराचा फोटो आणि सही
- मोबाईल नंबर / ईमेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र)
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
GMC Vacancy Important Links – महत्त्वाचा लिंक
| भरतीची जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
| अर्ज करण्याची लिंक | इथून अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट पहा | भेट द्या |
| व्हाट्सअप चॅनल | जॉईन व्हा |
Railway मध्ये Section Controller पदासाठी भरती निघाली आहे… इथून करा अर्ज
GMC Miraj Recruitment 2025 FAQ
1) GMC Miraj Group D Bharti 2025 एकूण पदे किती आहेत?
गट- ड अंतर्गत विविध पदे आहेत
2) GMC ग्रुप डी साठी वयोमर्यादा काय आहे?
किमान – 18 वर्षे
कमाल – 38 वर्षे (वयामध्ये सूट दिलेली आहे कृपया जाहिरात वाचावी)
3) GMC मिरज साठी वेतनश्रेणी किती आहे?
एकूण रक्कम 15 हजार ते 56 हजार 200 रुपये एवढा दिला जाईल (पण पदानुसार दिले जातील)
4) GMC मिरज ग्रुप डी साठी CBT परीक्षा कशी होते?
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते MCQ type राहते
एकूण 100 प्रश्न राहतील प्रत्येक 1 प्रश्न 2 गुणांसाठी राहील
मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक / अंकगणित हे 4 विषय आहेत
5) GMC भरतीसाठी अर्ज फी किती आहे?
खुला प्रवर्ग – ₹.1000/-
राखीव प्रवर्ग – ₹.900/-
6) GMC भरती निवड प्रक्रिया कशी आहे?
परीक्षा चाचणी
कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी
कागदपत्रे पडताळणी
अंतिम निवड यादी

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!





