NHM CPO Bharti 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य खात्यात सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली भरती निघाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत (कंत्राटी) या पदासाठी नवीन जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी असून यामध्ये तुम्हाला चांगला देखील पगार दिला जातो.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून यासाठी तुम्ही 04 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर अर्ज सादर करा.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया व पात्रता आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही ही संपूर्ण माहिती वाचा, मगच अर्जाला सुरुवात करा.
| विभाग | तपशील |
|---|---|
| भरतीचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025 |
| पदाचे नाव | समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) |
| रिक्त जागा | 1974 जागा |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| वेतनश्रेणी | ₹.25,000 ते ₹.35,000 पासून सुरू |
| शैक्षणिक पात्रता | BAMS, BUHS, B.Sc |
| वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 डिसेंबर 2025 |
| निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, अंतिम निवड, प्रशिक्षण |
| अधिकृत वेबसाईट | NHM |
NHM CPO Bharti 2025 Post & Vacancies – उपलब्ध पदे आणि रिक्त जागा
| अ.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|---|
| 1 | समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) CHO | 1974 |
Category Wise Vacancies – श्रेणीनुसार रिक्त जागा
| श्रेणी (Category) | रिक्त जागा |
|---|---|
| SC | 143 |
| ST | 103 |
| VJNT | 119 |
| SBC | 72 |
| OBC | 243 |
| SEBC | 197 |
| EWS | 197 |
| OPEN | 900 |
| एकूण | 1974 |
NHM CPO Bharti 2025 Eligibility Criteria – पात्रता निषक
खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पात्रता बघू शकता
शैक्षणीक पात्रता – (Education Qualification
- आयुर्वेद (BAMS) पदवीधर
- युनानी (BUMS) पदवीधर
- B.Sc (नर्सिंग)
- B.Sc (कम्युनिटी हेल्थ)
- अटी :
- उमेदवार हा भारतीचा नागरिक असावा
- महाराष्ट्रातील रहिवासी असावा
- मराठी भाषा येणे आवश्यक आहे
वयाची अट – (Age Limit)
उमेदवाराचे वय 04 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे
| श्रेणी | वय |
|---|---|
| वयाची अट | 18 ते 38 वर्षे |
| खुला प्रवर्ग | 38 वर्ष |
| मागासवर्गीय | 43 वर्ष |
| दिव्यांग / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त | 45 वर्ष सूट |
| माजी सैनिक | सशस्त्र दलात केलेली सेवा + 3 वर्ष सूट |
| खेळाडू | 43 वर्ष |
| अनाथ | 43 वर्ष सूट |
| स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य | 45 वर्ष सूट |
अर्जाची फी – (Application Fee)
| श्रेणी | फी |
|---|---|
| खुला प्रवर्ग | ₹.1000/- |
| मागासवर्गीय / अनाथ | ₹.900/- |
NHM CPO Bharti 2025 Selection Process – निवड प्रक्रिया
1) लेखी परीक्षा (Written Examination)
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात राहील
- परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील
- 100 गुणांसाठी राहतात
- 120 मिनिटं इतका कालावधी देण्यात येईल
- परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत प्रश्न होतील
| अ.क्र | विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|---|
| 1 | 1. Basic Concepts of Public Health 2. Basics of Human Body 3. Child Health 4. Adolescent Health 5. Maternal Health 6. Family Planning 7. Communicable Diseases 8. Non-Communicable Diseases 9. Nutrition 10. Mental Health 11. Skill Based Questions 12. Referral Linkage 13. Elderly and Palliative Care 14. Emergency Services 15. Oral, ENT | 60 | 60 |
| 2 | General Knowledge | 20 | 20 |
| 3 | NHM-Program Related | 20 | 20 |
| * | एकूण | 100 | 100 |
2) कागदपत्रे पडताळणी (Document Verification)
- लेखी परीक्षेचा कटऑफ लागला नंतर उमेदवारांना कागदपत्रे Verification साठी बोलावले
- उमेदवाराची पात्रता आणि पात्रता निकष पूर्ण झाले आहेत की नाही हे पडताळण्यासाठी ही Step महत्त्वाची आहे
- कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील
3) अंतिम निवड (Final Selection)
- लेखी परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी मध्ये पात्र ठरवलेले उमेदवारांचे निवड यादी जाहीर केली आहे
4) प्रशिक्षण (Training)
- परीक्षा आणि कागदपत्रे पडताळणी यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले उमेदवारांना प्रशिक्षण (Training) साठी बोलावले जाईल
- 6 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी आहे
- अंतिम प्लेसमेंटपूर्वी निवड प्रक्रियेचा हा प्रशिक्षण अनिवार्य भाग आहे
Important Dates – महत्वाचा तारखा
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 डिसेंबर 2025 |
| परीक्षेची तारीख | नंतर कळविण्यात येईल |
NHM CPO Bharti 2025 Document – कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड / पॅन कार्ड
- पासवर्ड फोटो
- सही
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- 10वी, 12वी गुणपत्रक / प्रमाणपत्र
- पदवीधर झालेले प्रमाणपत्र (Graduate)
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
NHM CPO Bharti 2025 Online Apply Process – अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी तुम्हाला वरती दिलेली माहिती संपूर्ण वाचून घ्या
- त्यानंतर खाली दिलेला Apply Now वर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्या
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगिन करा
- लॉगिन झाल्यावर तुम्हाला फॉर्म विचारलेली माहिती व्यवस्थित भरा
- माहिती भरल्यानंतर विचारलेले सर्व Document अपलोड करा
- त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार (Category) अर्जाची फी भरा
- एकदा संपूर्ण फोन तपासून घ्या माहिती चूक आढळल्यास दुरुस्त करा
- शेवटी अर्जला Submit करा
- अर्ज फॉर्म च प्रिंट काढून घ्या
Important Links – महत्वाचे लिंक्स
| जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
| ऑनलाइन अर्जाची लिंक | Apply Now |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट बघा |
| व्हॉट्सॲप चॅनल | जॉईन व्हा |
| पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची संधी | क्लिक करा |

सह्याद्री नेट कॅफे मध्ये आपले स्वागत आहे. विशेषतः माझ्या लेखनाच्या माध्यमातून लोकांना त्यांचे शिक्षण, शेती, नोकरी आणि व्यवसाय यासाठी मार्गदर्शनासोबतच योग्य आणि अचूक माहिती मार्गदर्शन करणे, हाच माझा हेतू आहे…!




